Posts

Showing posts from April, 2024

अमर्त्य सेन ((नोबेल पारितोषीक विजेते )

Image
   आमर्त्य सेन   अमर्त्य सेन अमर्त्य सेन  ( बांग्ला : অমর্ত্য সেন ,  उच्चार - ओमोर्तो शेन ;  रोमन लिपी :  Amartya Sen ) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे  बंगाली -भारतीय  अर्थशास्त्रज्ञ  व तत्त्वज्ञ आहेत. यांना  कल्याणाभिमुख अर्थशास्त्र [श १]  व  सामाजिक पर्याय सिद्धान्त [श २]  या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील  नोबेल पारितोषिक  देऊन गौरवण्यात आले. [१]  गरिबी ,आरोग्य ,शिक्षण , मानवी  विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे .  भारतीय केंद्रशासनाने   नालंदा विद्यापीठाच्या  निर्मितीसाठी  इ.स. २००७  साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे  [श ३]  हे अध्यक्ष आहेत  [२]  एकूण ४० वर्षात, ३०हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण [ संपादन ] अमर्त्य सेनचा जन्म बंगालमधील , ब्रिटिश भारतातील एका बंगाली हिंदू वैद्य कुटुंबात झाला होता...

अर्थशास्र याचे जनक ऍडम स्मिथ

Image
अ‍ॅडम स्मिथ: (५ जून १७२३—१७ जुलै १७९०). प्रख्यात स्कॉटिश राजकीय अर्थतज्ज्ञ व तत्त्वज्ञ. त्याचा जन्म स्कॉटलंडमधील करकॉल्दी येथे झाला. त्याच्या जन्मापूर्वीच त्याचे वडील वारले. त्यामुळे त्याचे संगोपन-शिक्षण आईनेच केले. सुरुवातीच्या शिक्षणानंतर तो ग्लासगो विद्यापीठात शिकत असताना त्याच्यावर फॅ्रन्सिस हचसन या शिक्षकाचा प्रभाव पडला. स्मिथने त्याच्या हाताखाली नैतिक तत्त्वज्ञानाचा तीन वर्षे अभ्यास केला व नंतर बॅलिऑल कॉलेज (ऑक्सफर्ड) मधून पदवी घेतली आणि परत करकॉल्दीला गेला (१७४४). अभ्यासाबरोबर त्याने आपल्या इंग्रजी साहित्यावर व्याख्याने दिली. पुढे तो एडिंबरोला गेला. तेथे त्याची डेव्हिड ह्यूमशी मैत्री झाली (१७४८). ग्लासगो विद्यापीठात स्मिथची तर्क- शास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (१७५१), तर १७५२ मध्ये नीतिशास्त्राचा प्राध्यापक म्हणून तो अध्यापन करू लागला. त्याचा द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेन्ट्स हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१७५९). त्यामध्ये त्याची ग्लासगो विद्यापीठात नीतिशास्त्रावर दिलेली व्याख्याने समाविष्ट होती. त्यात त्याने सहानुभूती ही सामान्य संवेदनातून उद्भवते आणि ती व्यक्तीत ममतेद्वारे संक्र...

अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक

  १९६८ पासून , सेवेरिजस रिक्सबँक (स्वीडनची मध्यवर्ती बँक) यांनी नोबेल पुरस्काराचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ मध्ये अर्थसास्त्रामधील पुरस्कार स्थापित केला. बँकेच्या ३०० व्या वर्धापन दिनानिमित्त १९६८ मध्ये सवेरीज रिक्सबँक कडून नोबेल फाऊंडेशनला मिळालेल्या देणगीवर हा नोबेल पारितोषिक आधारित आहे.अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकांची सुरुवात आल्फ्रेड नोबेलने यांनी केली नव्हती ,त्यांच्या स्मरणार्थ स्वीडनची मध्यवर्ती बँक १९६९ पासून अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार देत असते अर्थशास्त्रामध्ये मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना हे पारितोषिक देण्यात येते. १) 1969 -रॅगनर फ्रिश नॉर्वे ध्वज नॉर्वे "आर्थिक प्रक्रियेच्या विश्लेषणासाठी डायनॅमिक मॉडेल विकसित आणि लागू केल्याबद्दल"  यान टिम्बरगन Flag of the Netherlands नेदरलँड्स २) 1970- पॉल सॅम्युअलसन Flag of the United States अमेरिका "वैज्ञानिक कार्यासाठी ज्याद्वारे त्यांनी स्थिर आणि गतिशील आर्थिक सिद्धांत विकसित केला आहे आणि आर्थिक विज्ञानातील विश्लेषणाचा स्तर वाढविण्यासाठी सक्रियपणे योगदान दिले आहे"  ३) १...